|
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑपरेशन उमरी बँक’चित्रफितीचे विमोचन |
|
|
नांदेड दि७ (प्रतिनिधी) स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना समर्पित केलेला ‘ऑपरेशन उमरी बँक’ लघुपटाच्या डीव्हीडी व सीडी (चित्रफित) चे विमोचन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नवी विभामगृह नांदेड येथे करण्यात आले या लघु चित्रपटाची निर्मिती भारत वाळके यांनी केली असून आरआर मुव्हीज प्रस्तुत हा लघु चित्रपट आहे या छोट्याखानी कार्यक्रमास श्रीकर परदेशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हार्डीकर, आरएम सुर्वे, उतकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती या लघुपटानंतर हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर आधारित ‘हैद्राबाद मुक्तीची शौर्यगाथा लढा’ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लवकरच या चित्रपटाच्या लिखाणाचे काम भारत वाळके यांनी पूर्ण केले असून लवकरच यावर मोठा चित्रपट होवून मराठवाड्याची शौर्यगाथा पूर्ण देशासमोर यावी, असा त्यांचा मानस आहे
|