ग्रेडिंग पद्धत लागू करण्यापूर्वी विश्वासात घ्या डॉ निमसे | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
ग्रेडिंग पद्धत लागू करण्यापूर्वी विश्वासात घ्या डॉ निमसे प्रिंट ई-मेल
नवीन नांदेड दि७ (प्रतिनिधी) राज्य शासनाने विद्यापीठ व विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत क्रेडिट व ग्रेडिंग पद्धत अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत २०१०२०११ या वर्षापासून शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठाने ठरविले; परंतु या वर्षात क्रेडिट व ग्रेडिंग पद्धतीची कशी अंमलबजावणी करणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही प्राध्यापक महासंघाने याकडे लक्ष देऊन विद्यापीठाने ही पद्धत अमलात आणण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्याकडे केली आहे
शासनाचे काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व विद्यापीठांना २०१०२०११ पासून परीक्षेत क्रेडिट व ग्रेडिंग पद्धत अनिवार्य करण्याचे निर्देश बजाविले आहेत कुलगुरूंना जॉइंट बोर्डाने या आदेशाची अंमलबजावणी या वर्षापासूनच करण्याचे मान्य केले आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने क्रेडिट व ग्रेडिंग पद्धतीला हिरवा कंदील दाखविला; मात्र याबाबत विद्यापीठाने अंमलबजावणी कशी करणार, हे स्पष्ट केले नाही या निर्णयाकरिता कुठलेही नियोजन नाही क्रेडिट व ग्रेडिंग पद्धत सुरू करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे; परंतु याकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले याबाबत प्राध्यापक महासंघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा उत्तम सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली डॉ बी के शिंदे, प्रा सूर्यकांत जोगदंड, प्रा डॉ दीपक बच्चेवार आदींच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांची भेट घेऊन चर्चा केली विद्यापीठाने शासनाचा निर्णय जशास तसा अंमलबजावणीत आणण्याऐवजी यावर विद्यापीठाने कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करावे; तसेच शिक्षणात गुणवत्ता व पारदर्शकता आणण्यासाठी सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी भूमिका प्रा उत्तम सूर्यवंशी यांनी मांडली आहे विद्यापीठ संकुलात ग्रेडिंग व क्रेडिट पद्धत सुरू झाली आहे महाविद्यालय स्तरावरही ही पद्धत सुरू करण्यासाठी प्राध्यापक महासंघाच्या भूमिकेवर कुलगुरू डॉ निमसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवीत कार्यशाळा घेण्याचे मान्य केले सर्वांच्या विचारांतून ही पद्धत टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ निमसे यांनी शिष्टमंडळाला दिले]