|
ऑलम्पसच्या सहकार्याने करा गणेशाचे स्वागत |
|
|
नांदेड, दि७ (प्रतिनिधी) गणेशचतुर्थीनिमित्ताने ऑलिम्पस इमेजिंग कॉर्पोरेशन या आत्याधुनिक कॅमेरे तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने ग्राहकांमध्ये प्रसारासाठी सणासुदीच्या दिवसात केलेल्या खरेदीवर विविध ऑफर्स जाहीर केल्या असल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले आहे खास सणासुदीनिमित्ताने केल्या जाणाऱ्या खरेदीवर ऑलिम्पसने आपल्या मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राकरता खास ऑफर्स जाहीर केल्या असून ऑलिम्पसच्या कॅमेरा खरेदीवर ३४११ चे प्रोव्होग वॉच मोफत दिले जाणार आहे त्याचबरोबर ऑलिम्पच्या वतीने सध्याच्या वापरकर्त्यासमवेत नवीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही एक महिना मोफत सेवा दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्यात आपले अस्तित्व अधिक बळकळ करण्याच्या कंपनीच्या योजनेचा हा एक भाग असून गणेशाची विविध रंगातील आणि आकारातील रुपे घेणे ग्राहकांना शक्य होईल ऑलिम्पसने आपले वितरण जाळे विस्तारण्याची योजना तयार केली असून त्याअंतर्गत मागील वर्षी १५०० हून अधिक चॅनेल पार्टनर नेमण्यात आले असून यावषर्भ ही संख्या २००० पर्यंत पोहचली आहे ऑलिम्पसने खास सणानिमित्ताने ऑलिम्पस पेन ईपीएलआय, एमजेयू टफ सिरीज, व्हॉईस रेकॉर्डर, बायनॅक्युअर आणि अन्य अॅक्सेसरीजसारखी नवीन उत्पादने बाजारात आपली आहेत सहजपणे हलवता येण्याजोगे आणि वापरण्यास सोपे असे पेन ईपीएलआय स्पोट्स तंत्रज्ञान साधारनपणे मोठ्या, आत्याधुनिक कॅमेरांमध्ये वापरले जाते पातळ आणि सहज कुठेही मावेल अशा या कॅमेराकरता सोपे डिझाईन आणि हाताळण्याची सोपी पद्धती यामुळे ग्राहक याच्या मदतीने सहजपणे आकर्षक फोटो काढून शकतात आकारामध्ये लक्षणीयरित्या घट झाल्याने कॅमेरा पेनप्रमाणे दिसतो तसेच याच्या मदतीने उच्च दर्जाचे एसएलआरस्टाईल फोटोग्राफ काढता येतात एमजेयू सिरीजच्या ऑलिम्पस रेेंजमध्ये टफ कॅमेरांमध्ये १४ मेगापिक्सल स्टायलस टफ८०१०, टफ६०२० यांचा समावेश होत असून हे सर्व शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, क्रशप्रुफ आणि फ्रीजप्रुफ आहे हे स्पोट्स तंत्रज्ञान साधारपणे अत्याधुनिक प्रोफेशनल कॅमेरांमध्ये वापरले जाते टफ कॅमेरांच्या माध्यमातून वनटच बटन वापरुन ७२० पी एचडी व्हिडीओ घेतला जातो
|