|
‘सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पत्की समितीच्या शिफारशी लागू करा’ |
|
|
नांदेड दि७ (प्रतिनिधी) सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी व्यंकय्या पत्की समितीच्या शिफारशीची त्वरित अंमलबजावली करण्यासाठी नांदेड उत्तरचे आ डीपी सावंत यांना मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे येथील आयटीएम कॉलेज नांदेड येथे आयोजित विशेष बैठकीत हे निवेदन ४ रोजी देण्यात आले याप्रसंगी नादेड जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रशासक डॉ आरके पाटील, जयप्रकाश सुरनर, प्राचार्य सुरेंद्र खाडे यांच्यासह मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीस सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या संबंधी असलेल्या व्यंकय्या पत्की समितीच्या अहवालातील विविध पैलूंवर संजय पोत्तदार, महादेव आगजाळ, हवगी बेरकिळे, शेख एसआर, दशरथ क्षिरसागर आदींनी सविस्तर माहिती आडीपीसावंत यांच्यासमोर मांडली याप्रसंगी आडीपी सावंत यांनी सार्वग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांविषयी सविस्तर व सहनुभूतिपूर्वक चर्चा करुन यथायोग्य सहाकार्य करण्याचे अश्वासन दिले या प्रसंगी दशरथ क्षिरसागर, विलास शिंदे, राम मेकले, राजेश राऊत, सतिश टाकळकर, संजय पाटील, गोविंद जाधव, विनोद पावडे, विश्वनाथ डोंगरे, खोडवे, अशोक बाबू भोसीकर, बेंबडे विजयुमार, गौतम सूर्यवंशी आदी मान्यवरांसह मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन राजेश यांनी केले
|