|
विद्यापीठ परिसर विद्यार्थी परिषद सचिवपदी संतोष बागल |
|
|
नांदेड, दि८ (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर विद्यार्थी परिषद सचिवपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली यामध्ये रसायनशास्त्र संकुलांचा विद्यार्थी संतोष बालाजी बागल याची २० मताधिक्यानी सचिवपदी निवड झाली विद्यार्थी कल्याण विभागातर्फे विद्यापीठ परिसरातील सचिवपदासाठी निवडणूक घेण्यात आली सदरील निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठ परिसरातील विविध संकुले आणि उपकेंद्र लातूर येथील संकुलांचा समावेश असतो या पूर्ण परिसरातील एकूण ४० वर्ग प्रतिनिधी व २ महिला प्रतिनिधी असे एकूण ४२ मतदार आहेत पण त्यापैकी ३२ विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते यापैकी संतोष बागल व शैलेंद्र विठ्ठलराव मोरे यांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते या निवडणुकीत संतोष बागल यांना एकूण २६ मते मिळाली तर शैलेंद्र विठ्ठलराव मोरे यांना एकूण ६ मते मिळाली अशा प्रकारे संतोष बालाजी बागल यांना २० मताधिक्यांनी विजयी घोषित करण्यात आले निवडून आलेल्या उमेदवाराचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सर्जेराव निमसे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले सदरील निवडणूक प्रक्रिया समितीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व चोख बंदोबस्तात पार पडली यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा गणेश शिंदे, विद्यापीठ परिसर प्रभारी प्रा वैजनाथ अनमुलवाड, निवडणूक अधिकारी व सिनेट सदस्य डॉ अंबादास कदम, डॉ अंबादास कांबळे, डॉ डीबी पानसकर, बीपी तामसेकर, डॉ डीडी पवार इत्यादी उपस्थित होते
|