राष्ट्रीय स्तरावर दहा विद्यार्थी चमकले | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
राष्ट्रीय स्तरावर दहा विद्यार्थी चमकले प्रिंट ई-मेल
नांदेड दि७ (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दहा शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश प्राप्त केले आहे तसेच शिष्यवृत्ती धारकांच्या राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील चार विद्यार्थी चमकले या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
जिल्हा प्रशासनातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत गतवर्षी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात आल्या त्यामुळे गुणवान विद्यार्थ्यांना चांगले प्रोत्साहन मिळाले त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले स्वतः जिल्हाधिकारी डॉश्रीकर परदेशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अनेकदा संवाद साधला त्याचा चांगला परिणाम शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर झाला ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यशस्वी झाले आहेत
पुजा कदम ही (हातणी तालोहा) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी प्रथमच राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकली तसेच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोहा तालुक्यातील कारेगाव जिल्हा परिषद शाळेची आरती वाघमारे, नांदेेडच्या बाडवणा जिल्हा परिषद शाळेची शिंदे संजना आणि ग्यानमाता विद्याविहारचा