|
लाच घेणारे मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षासह लिपीक चतुर्भूज |
|
|
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ः महानगरपालिकेच्या एका शिपायाला सहकारी पत संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जाचा धनादेश देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या पतसंस्थेच्या अध्यक्षासह लिपीकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे नांदेड वाघाळा महानगर पालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले मधूकर भाऊराव कल्याणकर यांना कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी महानगरपालिकेची धनश्री सहकारी पतसंस्था यांच्याकडे १ लाख रुपये कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केला होता त्यांना १ लाख रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले होते परंतू मंजूर झालेल्या कर्जाचा १ लाख रुपयाचा धनादेश देण्यासाठी महानगरपालिकेच्या धनश्री सहकारी पथसंस्थेचे अध्यक्ष विलास सरनाईक व लिपीक प्रमोद देशमुख या दोघांजणांनी मधुकर भाऊराव कल्याणकर यांना १० हजार रुपयाची लाचेची मागणी केली यावेळी मधुकर कल्याणकर यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सुभाष बुरसे व पोलिस उपअधिक्षक संग्राम सांगळे यांच्याशी संपर्क साधला यावेळी पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सापळा रचला व पतसंस्थेचे अध्यक्ष विलास विठ्ठलराव सरनाईक व पतसंस्थेचा लिपीक प्रमोद देशमुख यास महानगरपालिकेचा शिपाई मधुकर
|