विविध संघटनांच्या संपाला नांदेडात उत्स्फूर्त प्रतिसाद | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
विविध संघटनांच्या संपाला नांदेडात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रिंट ई-मेल
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ः महागाई यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या विविध संघटनांच्या संपाला नांदेडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या संपात आयटक,सिटू,हिंद मजदूर सभा,इंटक व अन्य संघटनांनी सहभाग घेतला होता कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरण्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला
आजच्या संपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ,प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,बँक,दूरसंचार,बिडी कामगार,विमा कर्मचारी,हॉकर्स युनियन,एमआर संघटना,वर्कर्स फेडरेशन,वृत्तपत्र विक्रेता महासंघ,शालेय पोषण आहार कामगार संघटना व इतर कामगार संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेआजच्या संपामुळे अनेक शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसत होतात्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते वर्कशॉप येथून कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाहा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले