शेगाव नगरी भाविकांच्या विक्रमी गर्दीने दुमदुमली | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
शेगाव नगरी भाविकांच्या विक्रमी गर्दीने दुमदुमली प्रिंट ई-मेल
शेगाव,दि ५ (विशेष प्रतिनिधी) संज गजानन महाराज यांच्या प्रगटदिनासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यातील लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे संतनगरी दुमदुमून गेली ‘गण गण गणात बोते ज्ञानोबा तुकाराम गजानन महाराज की जय’ अशा घोषणा देत भाविकांनी गजानन महाराजाच्या समाधीच ेदर्शन घेतले या सोहळ्यासाठी राज्यभरातून दोन हजार भजनी दिंड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
संत गजानन महाराजांची समाधी शताब्दी येत्या सप्टेंबर महिन्यात आहे त्यामुळे आजच्या प्रकट उत्सवाला मोठे महत्व प्राप्त झाले होते गेल्या काही वर्षातील गर्दीचा उच्चांक यावर्षी मोडीत निघाला आहे शुक्रवारी सकाळी १० वाजता मंदिरात महारूद्र स्वाहा:कार यागाची पूर्णाहुती ब्रह्मवृंदाच्या मंत्रोपचारात झाली यावेळी संस्थानचे व्यवस्थापक शिवशंकर पाटील, अध्यक्ष डॉअशोक डांगरा यांच्यासह सर्व विश्वस्थ उपस्थित होते हभप तुकाराम महाराज शास्त्री यांचे प्रकटदिनावर किर्तनही झाले भल्या पहाटेपासूनच भाविकांचे समाधीसमोर मोठी रांग लागली होती दुपारी श्रींच्या चांदीच्या मुखवट्याची रथ, मेण्यातून भव्य परिक्रमा काढण्यात आली