विद्यूत मिटरमध्ये फेरफार करणाऱ्या २८ जणांवर कारवाई | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
विद्यूत मिटरमध्ये फेरफार करणाऱ्या २८ जणांवर कारवाई प्रिंट ई-मेल
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) मुखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी सुरू आहे या बाबत राज्य वितरणच्या पथकाने अचानक वीज मिटरची तपासणी चालवली असता वीज चोरी करणाऱ्या २८ ग्राहकांचे पितळ उघडे पडले या प्रकरणी ग्राहकांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे सहाय्यक अभियंता सतिश कांबळे यांनी सांगितले.
वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांपैकी काही जणांनी मात्र वेगळीच कहाणी सांगितली त्यांच्या म्हणण्यानुसार वीज मंडळाशी संबंधित असलेल्या एका युवकाने प्रत्येकी शे दोनशे रूपये घेवून मीटरची छेडछाड केली याद्वारे तुम्हाला बीलही कमी येईल तसेच आपण केलेला कारनामा वीज मंडळाचे अधिकारी उघड पाडू शकले तर आपण एक लाख रूपये बक्षीस देवू अशी छातीठोक खात्री सुद्धा दिली त्याच्या या थापेबाजीला बळी पडलेल्या ग्राहकांनी आपले मीटर त्याच्या स्वाधीन केले देगलूरच्या पथकाने आज मुखेड शहरातील अनेक वीज चोर रंगेहात पकडले यात कांता पोतदार, रमेश चौहाण, शंकर गोरलावार, उमाकांत पारसेवार, अल्लाउद्दीन मुनवर, गंगाधर चिंतमवाड, लालू चिंतमवाड, लक्ष्मण पोदार, लालू चिंतमवाड, मंगलाबाई उमाटे, संगीता जांबकर, शेख अलोद्दीन, सायन्ना बादेवाड, पद्मीन चौडेकर, महेश चौधरी, गणपत पाळेकर, विनोद मुपडे, बालाजी कवटीकवार, बापुराव जयवंतराव, राजेश चौधरी, सुलोचना बापुराव, शेषराव रामचंद्र, पारूबाई तजजीत, गौरेमिया, धोंडीबा गोविंद, शकुंतला बरडे, धोंडीबा गोविंदराव, हणमंत तुकाराम यांचा समावेश आहे