पोटदुखीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
पोटदुखीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या प्रिंट ई-मेल
अर्धापूर, दि५ (ताप्र) अर्धापूर तालुक्यातील शनी या गावचे दत्ता गोविंदराव कडे यांनी पोटदुखीच्या आजाराला कंटाळून दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केली .
या बाबत अधिक माहिती अशी की, दत्ता कडे यांना पोटदुखीचा आजार होता दीर्घकालीन उपचारानंतरही हा आजार कमी होण्याऐवजी जास्तच बळावला दत्ता कडे यांचे पोटाचे ऑपरेशनही झाले होते तथापी पोटदुखी कमी न झाल्यामुळे त्यांनी विष प्राशन केले दत्ता कडे यांना नांदेडच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले
तथापि डॉक्टरांचे उपचार चालू असतांनाच दत्ता कडे यांचा मृत्यू ओढवला या संदर्भात सीआरपीसीच्या १७४ कलमान्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार मोकमपल्ले आणि शेख जाफर करीत आहेत